रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा
Welcome!
समाजातील गरजू रुग्णांसोबतच सर्व सामाजिक घटकांच्या आर्थिक व सामाजिक गरजा लक्षात घेऊन ह्यांना किफायतशीर दरांमध्ये वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्या जातात.
बाळासाहेब देवरस पॉलीक्लीनिक आणि डायग्नोस्टिक सेंटर कोंढवा, पुणे – ४११०४८
दिनांक १६ जून २०१९ रोजी बाळासाहेब देवरस पॉलीक्लीनिक आणि डायग्नोस्टिक सेंटरची सुरुवात झाली. पुण्याच्या पूर्व भागाची गरज लक्षात घेता सोनोग्राफी, मेमोग्राफी, डिजिटल एक्स रे युनिट, स्ट्रेस टेस्ट, पॅथोलोजी लॅब, दंतचिकित्सा, नेत्रचिकित्सा तसेच आयुर्वेद व होमिओपॅथी आदी सुसज्ज व अत्याधुनिक तंत्रज्ञानाने समृद्ध विभागांचा अंतर्भाव करून ह्या सेंटरची वाटचाल सुरु झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेने पुण्यातील सेवाभावी स्वयंसेवकांनी पुणे वैद्यकीय सेवा व संशोधन प्रतिष्ठानाची स्थापना करून ह्या संस्थेच्या अंतर्गत बाळासाहेब देवरस पॉलीक्लीनिक आणि डायग्नोस्टिक सेंटर कार्यरत केले.
बाळासाहेब देवरस पॉलीक्लीनिकचा सेवा व संशोधन ह्या मुलतात्वांवर जास्त भर आहे. समाजातील गरजू रुग्णांसोबतच सर्व सामाजिक घटकांच्या आर्थिक व सामाजिक गरजा लक्षात घेऊन ह्यांना किफायतशीर दरांमध्ये वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्या जातात.
गेल्या वर्षाच्या कालावधीत लहानमुलांसाठी सुवर्ण बिंदू प्राशन संस्कार, सेवा ओपीडी, मधुमेह चिकित्सा आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, महिलांसाठी आवश्यक तपासणीचे अभियान ह्यासारखे अनेक उपक्रम सेंटरने कार्यान्वित केले. सामाजिक जाणीवेतून सेवा वस्त्यांची गरजध्यानात घेऊन सेवा वस्त्यांमधील नागरिकांकरिता सेवा ओपीडी अत्यल्प दरात प्रारंभ केला.
ह्या कार्यक्र्मान्सोब्तच नैसर्गिक आपदा काळात सेंटरने बहुमोल योगदान दिले. पूरस्थितीत पूरग्रस्तांसाठी आरोग्य शिबिरे व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मदतीने शिधावाटप करण्यात सेंटरने पुढाकार घेतला. ह्याजोडीला ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य प्रबोधनाचे अनेक कार्यक्रम घेतले गेके. पुना मेडिकल असोसिएशनच्या आवाहनानुसार एका दिवसात सुमारे १०६ महिलांचे हिमोग्लोबिन तपासून आवश्यक त्या औषधांचे वितरण व समुपदेशन करण्यात आले.
जगभर कोरोना चे थैमान सुरु आहे. ह्या परिस्थितीत प्रत्येक नागरिक कोरोना विरोधात लढतो आहे. परिस्थितीचे गांभीर्य आणि व्यापकता लक्षात घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व बाळासाहेब देवरस पॉलीक्लीनिक अँड डायग्नोस्टिक सेंटर ह्यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या सर्व उपलब्ध सेवांसह पुरेपूर योगदान दिले आहे व देत आहे.
सुरुवातीस संकटाचे स्वरूप व गांभीर्य लक्षात घेता नागरिकांना जागृत करण्यासाठी, तसेच शंका समाधान व मानसिक संतुलन राखण्याच्या उद्देशाने प्रबोधन व समुपदेशनासाठी एक गट तयार करून त्यांच्याद्वारेवैयक्तिक पातळीवर संपर्काची सेवा उपलब्ध करून देण्यात आली. अनेक नागरिकांनी मोबाईल वरून संपर्क करून ह्या योजनेचा लाभ घेतला. ह्या समितीत डॉक्टर्स, समुपदेशन तज्ञ, प्रतिष्टीत नागरिक ह्यांचा समावेश होता.
ह्यानंतरच्या पुढील भागात दि. २५ एप्रिल २०२० पासून लॉकडाउनचा कालावधी वगळता, भारतीय जैन सेवा संघाच्या मदतीने सेवा वस्त्यांमध्ये आरोग्य तपासणी, औषध वाटप, स्क्रीनिंग तसेच कोरोना रुग्ण शोधून त्यांना पुढील उपाययोजनांसाठी सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले.
Senior Services
Physicians & Nurses
Happy Seniors
Years of Experience
कोरोना परिस्थितीत सेवा वस्त्या केलेल्या एकूण शिबिरांचा तपशील खालील प्रमाणे:
अनु. नं. | वस्ती | शिबिरे | डॉक्टर | कार्यकर्ते | सहयोगी | एकूण रुग्ण |
१. | केदारेश्वर वस्ती | ११ | ३ | ५ |
| ६५५
|
२. | लोअर इंदिरा नगर | २ | ४ | ६ (स्थानिक) ४ (अ.भा.वि.प.) | अ.भा.वि.प. | २७५ |
३. | टिळेकर नगर | १ | १ | ६ |
| १५३ |
४. | राजीव गांधी नगर | २ | २ | ६ |
| १९७ |
५. | सिद्धार्थ नगर | २ | २ | ८ |
| १९३ |
६. | सुपर/अप्पर | २ | २ | ९ |
| १७३ |
७. | अप्पर डेपो | १ | १ | १३ | सेवा सहयोग | २२५ |
८. | पानसरे वस्ती, येवलेवाडी | ३ | ३ | ११ |
| ७१० |
९. | दशभुजा गणपती सहकार नगर | २ | २ | ११ | कोविड आर्मी | ९० |
१०. | ढुमे हॉल | १ | १ | ११ | कोविड आर्मी | ५२ |
एकूण | २७ |
| ९० |
| २७२३ |
वरील प्रमाणे आरोग्य शिबिरांचे आयोजन सुरु आहे.
लॉकडाऊनचा अंशतः कालावधी वगळता कोरोना खेरीज अन्य रुग्णांसाठी सर्व अंतर्भूत सेवा सेंटरद्वारे सुरु ठेवण्यात आल्या.
- सेंटरच्या आयुर्वेद विभागा मार्फत प्रतिबंधित काढा व अन्य औषधांची उपलब्धता करून देण्यात आली.
- सेंटरच्या होमिओपॅथि विभागामार्फतसुमारे ४००० लोकांना अर्सेनिक अल्बम च्या गोळ्याचे वाटप करण्यात आले.
- ह्याशिवाय सुमारे १००० नागरिकांना मास्क वाटप करण्यात आले.
- सेंटरच्या भोवती जनरल प्रॅक्टिस करणाऱ्या ओपीडी सुरु आहेत अशा सुमारे ३० डॉक्टर्सना सेंटरतर्फे पिपिई किट्स दिले जातात.
- सेंटर मध्ये रोज सुमारे ५० नागरिकांसाठी मोफत काढा वितरण केले जाते.
- सेंटरच्याऔषध विभागामार्फत नजीकच्या रुग्णांसाठी घरपोच औषध व्यवस्था कार्यरत आहे.
- नजीकच्या काळात कायम स्वरूपी किमान ५ ओपीडी सुरु करण्यात येणार आहेत.
- समाजाची निकड जाणून अशा अनेक उपक्रमांचे आयोजन सुरु आहे आणि सुरु राहील.
सर्वांच्या शुभेच्छा आणि सक्रीय पाठींब्यावर सेंटरची वाटचाल सुरु आहे.
धन्यवाद!!!
Contact for arranging a Camp