बाळासाहेब देवरस पॉलिक्लिनिक व डायग्नोस्टिक सेंटर
संस्था ओळख (संस्थेविषयी माहिती)
समाजातील सर्व स्तरातील किंवा कमी उत्पन्न गटातील नागरिकांना रास्त दरात आरोग्यसेवा देता याव्यात या एकमेव उद्देशाने महाराष्ट्र सार्वजनिक ट्रस्ट नियमांतर्गत, पुणे वैद्यकीय सेवा व संशोधन प्रतिष्ठान या धर्मादाय (चॅरिटेबल) प्रतिष्ठानाची (ट्रस्ट) स्थापना दि. १६ जून,२०१९ रोजी कोंढवा, पुणे येथे करण्यात आली.
हे प्रतिष्ठान (ट्रस्ट) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आर.एस.एस.) प्रेरित आहे. संस्थेचे उद्दिष्ट , पुणे शहराच्या पूर्व भागात राहणाऱ्या सर्व स्तरातील उत्पन्न गट असलेल्या नागरिकांसाठी, आर्थिक दृष्ट्या परवडणारी रोग निदान अथवा चिकित्सा सेवा व बहू – विविध आजारांवर उपचारांची सोय असलेले सुसज्ज असे अद्ययावत रुग्णालय उपलब्ध करणे होय.
प्रतिष्ठान अथवा संस्था संघ विचारधारणेने प्रेरित असल्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येकाची कमी शुल्कात उत्तम प्रकारे आरोग्याची काळजी घेण्यासाठी वचनबद्ध किंवा कटिबद्ध आहे.
संस्थेच्या संस्थापक मंडळामध्ये समर्पित भावनेने एकत्र आलेले विविध क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर्स व व्यावसायिक क्षेत्रातील मातब्बर मंडळींचा समावेश आहे.
रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा हे केंद्राचे मूळ तत्वज्ञान होय.
संस्थेची वैद्यकीय व व्यावसायिक नैतिकता, रुग्ण आरोग्य सेवांविषयीचा प्रामाणिकपणा व रुग्ण काळजी, यासाठी समर्पित आहे.
ज्यांच्यासाठी आम्ही काम करतो, अशा आमच्या रुग्ण, डॉक्टर्स, आणि समुदायासाठी अतिशय महत्वाचे तथा अत्यावश्यक व विश्वसनीय असलेले केंद्र म्हणून उत्कृष्ट प्रेरक शक्ती बनण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.
अध्यक्ष
सचिव
कोषाध्यक्ष
सहसचिव
सहकोषाध्यक्ष
संचालक
संचालक
संचालक
संचालक
संचालक
संचालक